8th Yashwant International Film Festival 2018 inaugurated

Share/Bookmark

By DR Gurdeep 09920014830 Email: indianshowbusiness@gmail.com

Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai, Pune Film Foundation and association with the Government of Maharashtra organizes 8th edition of the ‘Yashwant International Film Festival’ from 19th to 25th January 2018 at Yashwantrao Chavan Centre, Mumbai.

The event will be inaugurated on Friday, 19th January 2018 at 5pm in the main auditorium of Yashwantrao Chavan Center in Mumbai. On this occasion, every year, talented and legendary film personality is felicitated for their contribution to Indian Cinema. Last year, in 7th edition of YIFF, Mr. Pankaj Kapur graced the occasion.

Five films are screened in each venue in Chavan Centre every day during this film festival using DCP, Blue ray, DVD, 35MM, DG Beta and of these formats, Overall, around 75 films are screened during the festival as part of various sections

बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात..

 

बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८, शुक्रवार १९ जानेवारीपासून सुरु झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. मान्यवरांच्या आणि चित्रपट प्रेमिंच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी चित्रपट दिग्दर्शक व निर्माता रमेश सिप्पी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल सरचिटणीस शरद काळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच या महोत्सवात प्रतिष्ठानचे महोत्सव संचालक जब्बार पटेल, सरचिटणीस शरद काळे, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तसेच महोत्सव संचालक जब्बार पटेल यांनी महोत्सवाची भूमिका मांडली. त्यानंतर दिग्दर्शक व निर्माता रमेश सिप्पी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर प्रतिष्ठानचे कार्यक्रम
समन्वयक दत्ता बाळसराफ यांनी आभार प्रदर्शन केले.

 

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८ महोत्सवाचे यंदा ‘८ वे’ वर्ष आहे. या महोत्सवा दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यास गौरविण्यात येते. आतापर्यंत पंकूज कपूर अनुपम खेर, वहिदा रेहमान सारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे.

यंदा या महोत्सवात चित्रपट रसिकांसाठी विविध भाषेतील आणि विविध देशातील काही निवडक ८५ चित्रपटांची मेजवानी आहे. महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले ’स्मिता पाटिल स्मृती व्याख्यान’अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी गप्पा २० जानेवारी सायंकाळी ५ वाजता. होणार आहे, तसेच मोहन क्रिशनन यांचा मास्टर क्लास ‘पोस्ट प्रोडक्शन’ या विषयावर २३ जानेवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. २२ जानेवारीला सुश्रुत वैद्य हे हिंदी चित्रपटातील गाण्यामधील सामाजिक उत्क्रांतीचे प्रतिबिंब या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मुंबईकरांना जगभारतील विविध भाषातील नावाजलेले चित्रपट पाहता येणार आहे. चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की, चिली आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


*